Tuesday, June 14, 2016

चिकन मंचुरियन/chicken Manchurian

चिकन मंचुरियन/chicken Manchurian

४/५ लोकांसाठी
वेळ -अर्धा तास

साहित्य
बोनलेस चिकन 150 gram 
लसून बारीक कापलेला १ टीस्पून
आले बारीक कापलेले १ टीस्पून
कॉर्न फ्लोअर २ टीस्पून
सोया सॉस १ टीस्पून
रेड चीली सॉस १ ते २टीस्पून
ग्रीन चिली सॉस१ ते २ टीस्पून
1/4 अजिनोमोटो
व्हिनेगर १ टीस्पून
कांदा बारीक चिरलेला अर्धी वाटी
काळी मिरी पावडर १टीस्पून
लाल तिखट १/२ टीस्पून
मैदा १ वाटी
मीठ चवीनुसार
कांद्याची पात अर्धी वाटी
लिंबू रस १ टीस्पून


कृती:
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.त्याला थोडा लिंबाचा रस लावावा नंतर त्यात अर्धी वाटी मैदा ,कॉर्न फ्लोअर ,काळी मिरी पावडर ,लाल तिखट , मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे . एका कढई मध्ये तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत . उरलेले तेल काढून ठेवून त्यात बारीक केलेले आले ,लसून , बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावे त्यात सोया सॉस ग्रीन चिली सॉस,टोम्याटो सॉस , अजिनोमोटो,मीठ , व्हिनेगर टाकून २ मिनिट शिजवा.एका वाटीमध्ये थोडे पाणी धेऊन त्यात एक चमचा कॉर्न फ्लोअर टाका व ते मिश्रण चांगले मिक्स  करा व परतलेल्या मिश्रणात टाका   ..२ मिनिट शिजू द्यावे ..नंतर त्यात तळेलेले चिकन पीस टाकून मिक्स करावे..व कांद्याची पात पेरून सजवावे. व गरमागरम सर्व करा ..





No comments:

Post a Comment