Friday, June 17, 2016

पनीर चीज बॉल्स/Paneer cheese Balls

पनीर चीज बॉल्स/Paneer cheese Balls 

वेळ -अर्धा तास
३/४ लोकांसाठी

                                                                       PC-Unknown
साहित्य
१ वाटी पनीर किसलेले (Paneer)
२/३ हिरव्या मिरच्या चिरून (Green Chillies Finely chopped)
४ उकडलेले बटाटे कुस्करलेले (mashed Potatoes)
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोर (cornflour)
ताजी कोथिंबीर(fresh coriander leaves)
मीठ चाविनुसार (salt)
१ वाटी मोझरेला चीज किसलेले (mozzarella cheese) 
१ वाटी ब्रेड चुरा (breadcrumbs)
चाट मसाला (chat Masala)
तेल तळण्यासाठी (oil)

कृती

एका बाऊल मध्ये कुस्करलेले बटाटे ,चिरलेली हिरवी मिरची ,कॉर्नफ्लोर ,कोथिंबीर ,चाट मसाला  ,मीठ टाकून ते मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान गोळे करून ते चपटे करावे आणि व त्यात किसलेले पनीर आणि मोझरेला चीज घालून गोल गोळे करावेत .ब्रेड चा चुरा करून  एका प्लेट मध्ये ठेवा ..
एका बाऊल मध्ये ३ टीस्पून कॉर्नफ्लोर टाकून त्यात पाणी टाकून चांगले ढवळावे . त्यात तयार केलेले बॉल्स   ब्रेड च्या चुऱ्यात टाकून परत एकदा चुरा व्यवस्थित लागेपर्यंत हाताने प्रेस करावे  व  गोल आकार द्यावा व डीश मध्ये ठेवून द्यावे ..अशा प्रकारे सगळे balls करून डीश मध्ये ठेवावे
कढई मध्ये तेल गरम करून मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्यावे .टोम्याटो सॉस  बरोबर सर्व करावे 

No comments:

Post a Comment