Veg/शाकाहारी पदार्थ

पनीर मलई




PANEER MALAI






वाढणी- ३ ते ४ लोकांसाठी


साहित्य: 

पनीर पाव किलो
एक कांदा
चार टोमाटो
८-९ लसून पाकळ्या
अल पाव इंच
कोथिंबीर + पुदिना एक वाटी
ओला नारळ चार इंच तुकडा
गरम मसाला
बटर चार चमचे
मीठ एक चमचा
एक वाटी मलई दूध
एक कप दही
लाल मिरची पावडर एक चमचा
मिरपूड एक चमचा

शिमला मिरची


कृती :-
प्रथम कांदा ,लसून ,नारळ ,अल ,
टोमाटो ,कोथिंबीर ,पुदिना यांची
पेस्ट तयार करून घ्यावी
पनीरचे तुकडे ओवन मध्ये
बेक करून घ्यावे लालसर रंगावर
एका कढइत चार चमचे बटर
टाकून मसाला परतून घ्यावा
लाल मिरची पावडर, मीठ ,गरम मसाला व
मिरपूड टाकून परतून घ्यावे
एक कप दही आणि
एक वाटी मलई घालून
मसाला शिजून द्यावा
'त्यात बेक केलेले पनिरचे तुकडे
टाकून मंद आचेवर १० मिनिट शिजवावे
शिजताना दोन खारी बिस्कीट टाकावेत
त्याने मसाला घट्ट होतो व
पाण्याचा अंश निघून जातो
पनीर बेक केल्याने चवदार लागते
करून बघा आगळी वेगळी रेसिईप

आवडेल जरूर नक्की करून पहा !!

No comments:

Post a Comment