साहित्य
ब्रेड स्लायीस
काकडी
फ्रेश क्रीम
चीज स्लायीस
कोथिंबीर चिरलेली
टोमटो
चिंच पाणी
मीठ
कांदा
कृती
प्रथम काकडी ,कांदा टोमटो,शिमला मिर्च कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत व ते नंतर क्रीम मध्ये मिक्स करावे। ब्रेड घेऊन त्यावर चिंच पाणी लावून त्यावर मिक्स केलेली क्रीम लावावी आणि दुसरा ब्रेड ठेवावा त्यावर काकडी टोमटो कांदा चीज यांच्या स्लायीस ठेवाव्यात। त्यावर पुन्हा एक ब्रेड ठेवावा आणि हलकासा प्रेस करावे। आणि त्याचे सुरीने त्रिकोणी काप करावेत। हे क्रिमी sandwich. चवीला खूप छान लागतात।
French Fries/ फिंगर चिप्स
वेळ १५ मिनिट
साहित्य
४/५ मध्यम आकाराचे बटाटे
तळण्यासाठी तेल
मीठ
कृती:
प्रथम बटाट्याचे साल काढून घ्यावे आणि त्याच्या उभ्या चौकोनी काप करावेत . पातेल्यात पाणी उकळून त्यात थोडे मीठ टाकून हे काप ५ मिनिट उकळून द्यावे .नंतर हे काप एका डिश मध्ये काढून टिश्यू पेपर ने कोरडे करावेत. कढईमध्ये तेल तापायला ठेवून मंद आचेवर तळून घ्यावे.. टोम्याटो सॉस बरोबर छान लागतात
No comments:
Post a Comment