Showing posts with label Non -Veg Receipes. Show all posts
Showing posts with label Non -Veg Receipes. Show all posts

Tuesday, June 14, 2016

चिकन मंचुरियन/chicken Manchurian

चिकन मंचुरियन/chicken Manchurian

४/५ लोकांसाठी
वेळ -अर्धा तास

साहित्य
बोनलेस चिकन 150 gram 
लसून बारीक कापलेला १ टीस्पून
आले बारीक कापलेले १ टीस्पून
कॉर्न फ्लोअर २ टीस्पून
सोया सॉस १ टीस्पून
रेड चीली सॉस १ ते २टीस्पून
ग्रीन चिली सॉस१ ते २ टीस्पून
1/4 अजिनोमोटो
व्हिनेगर १ टीस्पून
कांदा बारीक चिरलेला अर्धी वाटी
काळी मिरी पावडर १टीस्पून
लाल तिखट १/२ टीस्पून
मैदा १ वाटी
मीठ चवीनुसार
कांद्याची पात अर्धी वाटी
लिंबू रस १ टीस्पून


कृती:
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.त्याला थोडा लिंबाचा रस लावावा नंतर त्यात अर्धी वाटी मैदा ,कॉर्न फ्लोअर ,काळी मिरी पावडर ,लाल तिखट , मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे . एका कढई मध्ये तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत . उरलेले तेल काढून ठेवून त्यात बारीक केलेले आले ,लसून , बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावे त्यात सोया सॉस ग्रीन चिली सॉस,टोम्याटो सॉस , अजिनोमोटो,मीठ , व्हिनेगर टाकून २ मिनिट शिजवा.एका वाटीमध्ये थोडे पाणी धेऊन त्यात एक चमचा कॉर्न फ्लोअर टाका व ते मिश्रण चांगले मिक्स  करा व परतलेल्या मिश्रणात टाका   ..२ मिनिट शिजू द्यावे ..नंतर त्यात तळेलेले चिकन पीस टाकून मिक्स करावे..व कांद्याची पात पेरून सजवावे. व गरमागरम सर्व करा ..





Monday, June 13, 2016

चिकन नुडल्स

चिकन नुडल्स


वेळ १5 मिनिट
४-५ लोकांसाठी

साहित्य
चिकन बोनलेस(boneless chicken)
Instant नुडल्स(instant Noodals)
गाजर बारीक चिरून
लसून बारीक कापलेला(garlic finely chopped)
आले बारीक कापलेले.(ginger finely chopped)
ताजी लाल मिरची ३ (Fresh Red Chillies)
कांदा उभा चिरलेला(Chopped Onion)
अर्धी वाटी मशरूम (आवडीनुसार)(mushroom half bowl)
मक्याचे दाने अर्धी वाटी(corn half bowl)
चिकन stock (chicken stock)
सोया सौस (सोया souse )
कांद्याची पात(Spring Onion Greens)

कृती
कढइत २ चमचे तेल टाका त्यात बारीक केलेला लसून, आले ,लाल मिरची ,कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करा .नंतर चिकन टाकून १/2 मिनिट शिजू द्या. मशरूम,गाजर, मका दाने मीठ टाकून व्यवस्थित हलवा नंतर नूडल्स टाकून परतून घ्यावे ..chicken stock ,light सोया souse घालून १० मिनिट शिजू द्यावे ..सजविण्यासाठी कांद्याची पात पेरावी ..गरम गरम नूडल्स फार छान लागतात ..एकदा करून बघा ..



Monday, May 23, 2016

chicken biryani/ चिकन बिर्याणी

chicken biryani/ चिकन बिर्याणी 

(३/४ लोकांसाठी ) वेळ अर्धा तास 
साहित्य :

बासमती तांदूळ अर्धा किलो 
चिकन अर्धा किलो
गरम मसाला , मसाला वाटन
एवरेस्ट चिकन मसाला.
तमालपत्र 
लवंग ,शहाजिरे,दालचिनी ,काजू,काळी मिरी ,धने
बिर्याणी मसाला
कांदा बारीक चिरलेला १ वाटी 
३/४ टोमॅटो प्युरी 
आले लसून पेस्ट १ चमचा 
दही अर्धी वाटी 
लाल तिखट अंदाजानुसार
तूप 
 १ वाटी चिरलेली कोथिंबीर
तेल अंदाजानुसार
मीठ चवीनुसार
खायचा कलर 
पुदिना



कृती:

चिकन म्यारीनेट साठी:-
एका भांडयामध्ये चिकन स्वच्छ धुवून घ्यावे .नंतर त्यामध्ये आले लसून पेस्ट ,१ चमचा लाल तिखट , एक लहान चमचा मिरी,दालचिनी पावडर, दही, एक चमचा तेल   ,हळद आणि मीठ टाकून ते चांगले एकमेकांत मिसळावे आणि अर्धा तास  ठेवावे

भात शिजवण्यासाठी -
प्रथम बासमती तांदूळ धुवून निथाल्ण्यास ठेवावे. एका मोठ्या पातेल्यामध्ये २ लहान चमचे तेल टाकून त्यात थोडं शहाजिरे ,३/४  काळी मिरी एक तुकडा दालचिनी ,तमालपत्र टाकावे त्यानंतर ३ तांबे पाणी घालाले (आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकता ) पाण्याला उकळी आली कि त्यात धुतलेले  तांदूळ टाकावे व ते अर्धवट शिजवून घ्यावे आणि चलनी मध्ये निथळन्यास ठेवावे

चिकन ग्रेवी :-
 प्रथम कढई मध्ये गरजेनुसार तेल टाकून त्यात उभा चिरलेला कांदा आणि काजू टाळून घ्या (काजू ऐवजी शेंगदाणे पण वापरू शकता )   उरेल्या तेलात  आले लसून पेस्ट परतून घ्यावे त्यानंतर त्यात  चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतवा  त्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकावी व ती थोड्यावेळ शिजून द्यावी  नंतर त्यात मसाला वाटण,एवरेस्ट मसाला ,लाल तिखट ,बिर्याणी मसाला ,हळद ,मीठ , कोथिंबीर पुदिन्याची ३ पाने  मीठ आणि म्यारीनेट केलेले चिकन टाकावे व ते  चांगले परतून घ्यावे व त्यात थोडेसे पाणी टाकून मंद आचेवर १० मिनिट शिजवून
 घ्यावे

बिर्याणी :

एका मोठ्या पातेल्यात सगळीकडून तूप  लावावे त्यानंतर त्यात अर्धवट शिजविलेला  एक थर चिकन चा द्यावा त्यावर निथळ लेले तांदूळ पसरावे  परत एक थर चिकन चा द्यावा त्यावर पुन्हा एक थर तांदळाचा द्यावा त्यावर तळलेला कांदा ,काजू कोथिंबीर ,पुदिना पाने, आणि खायचा कलर घालावा ..पातेल्याला गव्हाचे मळलेले  पीठ लावून हवाबंद  झाकण लावून १५ मिनिट मंद आचेवर शिजवून द्यावे  आणि गरमागरम बिर्याणी कोशिंबीर बरोबर सर्व करावी .

तंदुरी चिकन /tandoori chicken

तंदुरी चिकन /tandoori chicken

३/४ लोकांसाठी (वेळ अर्धा तास )

साहित्य

चिकन लेग पिस ४/५
खडा मसाला बारीक करून १ चमचा 
दही 
लिंबू
आले लसून पेस्ट
मिरी पावडर
तंदुरी चिकन मसाला
लाल तिखट अंदाजानुसार
मीठ अंदाज नुसार
तेल
खायचा कलर लाल

salad-

१ वाटी कापलेला कोबी
१ वाटी उभा चिरलेला कांदा
१ वाटी शिमला मिर्च चिरलेली
कोथिंबीर
लाल तिखट
लिंबू
मीठ चवीनुसार

कृती

प्रथम एका भांड्यात चिकन लेग पीस धुवून घ्यावे आणि त्याला बारीक चिरा पाडाव्यात त्यात दही ,काळी मिरी पावडर ,खडा मसाला पावडर ,लाल तिखट ,लिंबू पिळून , खायचा कलर ,मीठ अंदाजानुसार, २ चमचे तेल टाकावे आणि ते व्यवस्थित म्यारीनेट करावे (अंदाजे ४ तास  मिश्रण ठेवावे )

४ तासानंतर  मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि तंदूर मध्ये २५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे आणि गरमागरम salad बरोबर सर्व करावे

( salad साठी )

चिरलेला कोबी,कांदा ,कोथिंबीर एकत्रित करावे त्यात लिंबू पिळून लाल तिखट, मीठ घालावे आणि व्यवस्थित मिसळावे