Monday, June 20, 2016

खमण ढोकळा

वाढणी- ३/४ लोकांसाठी
वेळ -अर्धा तास
                                                                   PC-Unknown

साहित्य
१ वाटी बेसन पीठ
१ वाटी ताक
१ टीस्पून लिंबांचा रस
मीठ चवीनुसार
१ टीस्पून आले लसून पेस्ट
१ टीस्पून ग्रीन चिली पेस्ट
१ चमचा रवा
२ टीस्पून एनो /सायट्रिक असिड
तेल
१ टीस्पून हिंग
फोडणीसाठी मोहरी
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धी वाटी खोबरे किसून
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

१)एका भांड्यात १ वाटी बेसन पीठ ,लिंबाचा रस ,ग्रीन चिली पेस्ट ,आले लसून पेस्ट  ,मीठ , रवा ,तेल घालून एकत्र करावे व त्यात १ वाटी ताक घालून मिश्रण चांगले एकजीव करावे व ते साधारण २ तास भिजत ठेवावे
२)नंतर त्यात एनो /सायट्रिक असिड टाकावे व मिश्रण ढवळून घ्यावे ..थोड्या वेळात मिश्रण फससते .
३)एका प्यान मध्ये दीड तांबे पाणी उकळत ठेवावे.
४).प्यान मध्ये बसेल अशा आकाराचे २ समान भांडे घ्यावे  द त्याला पूर्ण भांड्याला तेल लावून घ्यावे व त्यात अर्धे अर्धे मिश्रण ओतून ते प्यान मध्ये ठेवून द्यावे व त्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेवावे ..आणि ते अर्धा तास मध्यम आचेवर शिजवून घ्यावे (ढोकळा प्यान असेल तर उत्तमच  )..ढोकळा शिजत असताना झाकण उचलू नये ..ढोकळा फुगला कि त्यात चमचा घालून शिजला कि नाही ते पाहावे..जर ढोकळा चमच्याला चिकटला नाही तर ढोकळा पूर्ण शिजला असे समजावे
फोडणी
५) तडका प्यान मध्ये तेल घालून त्यात मोहरी ,कापलेल्या हिरव्या मिरच्या ,थोडे मीठ ,हिंग टाकून फोडणी करावी व ती कोमात झाल्यावत शिजलेल्या ढोकळ्यावर पसरावी
६)सजविण्यासाठी खोबर्याचा कीस व चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी
 व समांतर कप करावेत  करावेत

(टीप जर बेकिंग सोडा घालणार असाल तर हळद वापरू नका..हळद आणि सोडा एकत्र केल्यावर रंग
 लाल होऊ शकतो )

Friday, June 17, 2016

पनीर चीज बॉल्स/Paneer cheese Balls

पनीर चीज बॉल्स/Paneer cheese Balls 

वेळ -अर्धा तास
३/४ लोकांसाठी

                                                                       PC-Unknown
साहित्य
१ वाटी पनीर किसलेले (Paneer)
२/३ हिरव्या मिरच्या चिरून (Green Chillies Finely chopped)
४ उकडलेले बटाटे कुस्करलेले (mashed Potatoes)
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोर (cornflour)
ताजी कोथिंबीर(fresh coriander leaves)
मीठ चाविनुसार (salt)
१ वाटी मोझरेला चीज किसलेले (mozzarella cheese) 
१ वाटी ब्रेड चुरा (breadcrumbs)
चाट मसाला (chat Masala)
तेल तळण्यासाठी (oil)

कृती

एका बाऊल मध्ये कुस्करलेले बटाटे ,चिरलेली हिरवी मिरची ,कॉर्नफ्लोर ,कोथिंबीर ,चाट मसाला  ,मीठ टाकून ते मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान गोळे करून ते चपटे करावे आणि व त्यात किसलेले पनीर आणि मोझरेला चीज घालून गोल गोळे करावेत .ब्रेड चा चुरा करून  एका प्लेट मध्ये ठेवा ..
एका बाऊल मध्ये ३ टीस्पून कॉर्नफ्लोर टाकून त्यात पाणी टाकून चांगले ढवळावे . त्यात तयार केलेले बॉल्स   ब्रेड च्या चुऱ्यात टाकून परत एकदा चुरा व्यवस्थित लागेपर्यंत हाताने प्रेस करावे  व  गोल आकार द्यावा व डीश मध्ये ठेवून द्यावे ..अशा प्रकारे सगळे balls करून डीश मध्ये ठेवावे
कढई मध्ये तेल गरम करून मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्यावे .टोम्याटो सॉस  बरोबर सर्व करावे 

Thursday, June 16, 2016

कटलेट्स/ Potato cutlets /आलू टिक्की

कटलेट्स/ Potato cutlets
वेळ २० मिनिट
४/५ लोकांसाठी
                                                                      PC-Unknown
साहित्य

४ उकडलेले बटाटे (Mashed potatoes)
 अर्धी वाटी ओले वाटाणे (Greenpeace)
१ टीस्पून आले लसून पेस्ट (Ginger garlic pest )
१ टीस्पून ग्रीन चिली पेस्ट (Green Chilly Pest)
१ टीस्पून धना पावडर (Coriander Powder)
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा (finely chopped Onion)
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर(finely Chopped Coriander leaves)
१ वाटी ब्रेड चुरा (Breadcrumbs)
१/२ टीस्पून काळी मिरी पावडर (black paper)
कॉर्नफ्लोर (Cornfloar)
मीठ चवीनुसार (solt)
तळण्यासाठी तेल(Oil)

कृती-

प्रथम एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या त्यात ओले वाटाणे, आले लसून पेस्ट ,ग्रीन चिली, पेस्ट धना पावडर , काळीमिरी पावडर ,बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर ,कॉर्नफ्लोर,मीठ टाकून त ते मिश्रण  व्यवस्थित मळून घ्यावे.व त्याच्या गोलाकार टिक्की बनवाव्यात .
एका लहान बाऊल मध्ये पाणी घेऊन त्यात ३ चमचे कॉर्नफ्लोर मिक्स करावी व तयार केलेल्या टिक्की त्यात बुडवून त्यावर bread चा चुरा  (Breadcrumbs) पसरावा. व परत गोलाकार टिक्की करून घ्यावात  व एका कढई मध्ये तेल गरम करून मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्याव्यात .. (तव्यावर तेल सोडून खमंग भाजू सुद्धा शकता) टोम्याटो सॉस बरोबर गरम गरम सर्व कराव्यात


Tuesday, June 14, 2016

इडली

इडली

वेळ अर्धा तास
४/५ लोकांसाठी



साहित्य
३ वाटी तांदूळ
१ वाटी पांढरी उडीद डाळ
१ टीस्पून बेकिंग सोडा/ सायट्रिक असिड
१ वाटी दही 
मीठ -चवीनुसार

कृती
एका भांड्यात तांदूळ आणि पांढरी उडीद डाळ सेपरेट  ६ तास भिजत  घालावी. नंतर मिक्सर वर बारीक वाटून घ्यावे व दोन्ही  एकत्र करावे त्यात बेकिंग सोडा ,मीठ ,दही,एक चमचा तेल घालून  मिक्स करावे व मिश्रण चांगले हलवावे आणि अर्ध्या तासानंतर इडलीच्या भांडयात मिश्रण ओतून १० मिनिट इडल्या वाफवून घ्याव्यात .
गरमागर इडल्या सांबर किवा चटणीबरोबर छान लागतात ..

चिकन मंचुरियन/chicken Manchurian

चिकन मंचुरियन/chicken Manchurian

४/५ लोकांसाठी
वेळ -अर्धा तास

साहित्य
बोनलेस चिकन 150 gram 
लसून बारीक कापलेला १ टीस्पून
आले बारीक कापलेले १ टीस्पून
कॉर्न फ्लोअर २ टीस्पून
सोया सॉस १ टीस्पून
रेड चीली सॉस १ ते २टीस्पून
ग्रीन चिली सॉस१ ते २ टीस्पून
1/4 अजिनोमोटो
व्हिनेगर १ टीस्पून
कांदा बारीक चिरलेला अर्धी वाटी
काळी मिरी पावडर १टीस्पून
लाल तिखट १/२ टीस्पून
मैदा १ वाटी
मीठ चवीनुसार
कांद्याची पात अर्धी वाटी
लिंबू रस १ टीस्पून


कृती:
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.त्याला थोडा लिंबाचा रस लावावा नंतर त्यात अर्धी वाटी मैदा ,कॉर्न फ्लोअर ,काळी मिरी पावडर ,लाल तिखट , मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे . एका कढई मध्ये तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत . उरलेले तेल काढून ठेवून त्यात बारीक केलेले आले ,लसून , बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावे त्यात सोया सॉस ग्रीन चिली सॉस,टोम्याटो सॉस , अजिनोमोटो,मीठ , व्हिनेगर टाकून २ मिनिट शिजवा.एका वाटीमध्ये थोडे पाणी धेऊन त्यात एक चमचा कॉर्न फ्लोअर टाका व ते मिश्रण चांगले मिक्स  करा व परतलेल्या मिश्रणात टाका   ..२ मिनिट शिजू द्यावे ..नंतर त्यात तळेलेले चिकन पीस टाकून मिक्स करावे..व कांद्याची पात पेरून सजवावे. व गरमागरम सर्व करा ..





Monday, June 13, 2016

चिकन नुडल्स

चिकन नुडल्स


वेळ १5 मिनिट
४-५ लोकांसाठी

साहित्य
चिकन बोनलेस(boneless chicken)
Instant नुडल्स(instant Noodals)
गाजर बारीक चिरून
लसून बारीक कापलेला(garlic finely chopped)
आले बारीक कापलेले.(ginger finely chopped)
ताजी लाल मिरची ३ (Fresh Red Chillies)
कांदा उभा चिरलेला(Chopped Onion)
अर्धी वाटी मशरूम (आवडीनुसार)(mushroom half bowl)
मक्याचे दाने अर्धी वाटी(corn half bowl)
चिकन stock (chicken stock)
सोया सौस (सोया souse )
कांद्याची पात(Spring Onion Greens)

कृती
कढइत २ चमचे तेल टाका त्यात बारीक केलेला लसून, आले ,लाल मिरची ,कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करा .नंतर चिकन टाकून १/2 मिनिट शिजू द्या. मशरूम,गाजर, मका दाने मीठ टाकून व्यवस्थित हलवा नंतर नूडल्स टाकून परतून घ्यावे ..chicken stock ,light सोया souse घालून १० मिनिट शिजू द्यावे ..सजविण्यासाठी कांद्याची पात पेरावी ..गरम गरम नूडल्स फार छान लागतात ..एकदा करून बघा ..