तंदुरी चिकन /tandoori chicken
३/४ लोकांसाठी (वेळ अर्धा तास )
साहित्य
चिकन लेग पिस ४/५
खडा मसाला बारीक करून १ चमचा
दही
लिंबू
आले लसून पेस्ट
मिरी पावडर
तंदुरी चिकन मसाला
लाल तिखट अंदाजानुसार
मीठ अंदाज नुसार
तेल
खायचा कलर लाल
salad-
१ वाटी कापलेला कोबी
१ वाटी उभा चिरलेला कांदा
१ वाटी शिमला मिर्च चिरलेली
कोथिंबीर
लाल तिखट
लिंबू
मीठ चवीनुसार
कृती
प्रथम एका भांड्यात चिकन लेग पीस धुवून घ्यावे आणि त्याला बारीक चिरा पाडाव्यात त्यात दही ,काळी मिरी पावडर ,खडा मसाला पावडर ,लाल तिखट ,लिंबू पिळून , खायचा कलर ,मीठ अंदाजानुसार, २ चमचे तेल टाकावे आणि ते व्यवस्थित म्यारीनेट करावे (अंदाजे ४ तास मिश्रण ठेवावे )
४ तासानंतर मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि तंदूर मध्ये २५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे आणि गरमागरम salad बरोबर सर्व करावे
( salad साठी )
चिरलेला कोबी,कांदा ,कोथिंबीर एकत्रित करावे त्यात लिंबू पिळून लाल तिखट, मीठ घालावे आणि व्यवस्थित मिसळावे
No comments:
Post a Comment