Monday, May 23, 2016

chicken biryani/ चिकन बिर्याणी

chicken biryani/ चिकन बिर्याणी 

(३/४ लोकांसाठी ) वेळ अर्धा तास 
साहित्य :

बासमती तांदूळ अर्धा किलो 
चिकन अर्धा किलो
गरम मसाला , मसाला वाटन
एवरेस्ट चिकन मसाला.
तमालपत्र 
लवंग ,शहाजिरे,दालचिनी ,काजू,काळी मिरी ,धने
बिर्याणी मसाला
कांदा बारीक चिरलेला १ वाटी 
३/४ टोमॅटो प्युरी 
आले लसून पेस्ट १ चमचा 
दही अर्धी वाटी 
लाल तिखट अंदाजानुसार
तूप 
 १ वाटी चिरलेली कोथिंबीर
तेल अंदाजानुसार
मीठ चवीनुसार
खायचा कलर 
पुदिना



कृती:

चिकन म्यारीनेट साठी:-
एका भांडयामध्ये चिकन स्वच्छ धुवून घ्यावे .नंतर त्यामध्ये आले लसून पेस्ट ,१ चमचा लाल तिखट , एक लहान चमचा मिरी,दालचिनी पावडर, दही, एक चमचा तेल   ,हळद आणि मीठ टाकून ते चांगले एकमेकांत मिसळावे आणि अर्धा तास  ठेवावे

भात शिजवण्यासाठी -
प्रथम बासमती तांदूळ धुवून निथाल्ण्यास ठेवावे. एका मोठ्या पातेल्यामध्ये २ लहान चमचे तेल टाकून त्यात थोडं शहाजिरे ,३/४  काळी मिरी एक तुकडा दालचिनी ,तमालपत्र टाकावे त्यानंतर ३ तांबे पाणी घालाले (आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकता ) पाण्याला उकळी आली कि त्यात धुतलेले  तांदूळ टाकावे व ते अर्धवट शिजवून घ्यावे आणि चलनी मध्ये निथळन्यास ठेवावे

चिकन ग्रेवी :-
 प्रथम कढई मध्ये गरजेनुसार तेल टाकून त्यात उभा चिरलेला कांदा आणि काजू टाळून घ्या (काजू ऐवजी शेंगदाणे पण वापरू शकता )   उरेल्या तेलात  आले लसून पेस्ट परतून घ्यावे त्यानंतर त्यात  चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतवा  त्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकावी व ती थोड्यावेळ शिजून द्यावी  नंतर त्यात मसाला वाटण,एवरेस्ट मसाला ,लाल तिखट ,बिर्याणी मसाला ,हळद ,मीठ , कोथिंबीर पुदिन्याची ३ पाने  मीठ आणि म्यारीनेट केलेले चिकन टाकावे व ते  चांगले परतून घ्यावे व त्यात थोडेसे पाणी टाकून मंद आचेवर १० मिनिट शिजवून
 घ्यावे

बिर्याणी :

एका मोठ्या पातेल्यात सगळीकडून तूप  लावावे त्यानंतर त्यात अर्धवट शिजविलेला  एक थर चिकन चा द्यावा त्यावर निथळ लेले तांदूळ पसरावे  परत एक थर चिकन चा द्यावा त्यावर पुन्हा एक थर तांदळाचा द्यावा त्यावर तळलेला कांदा ,काजू कोथिंबीर ,पुदिना पाने, आणि खायचा कलर घालावा ..पातेल्याला गव्हाचे मळलेले  पीठ लावून हवाबंद  झाकण लावून १५ मिनिट मंद आचेवर शिजवून द्यावे  आणि गरमागरम बिर्याणी कोशिंबीर बरोबर सर्व करावी .

No comments:

Post a Comment